SAMEEP
 
B- Safe
          
     
           
     
           
     
           
Safety Tips
 
सतर्कता हीच रेल्वे सुरक्षितता
 
1. रेल्वे डब्यात किंवा रेल्वे स्टेशन परिसरात कोणतीही अनोळखी / संशयास्पद वस्तू, बॅग आढळल्यास त्यास न हातळता, स्पर्श न करता त्याची खबर तात्काळ आर. पी. एफ./ जी. आर. पी. यांना द्यावी.
   
2. सभोवतालच्या संशयित हालचाली व घटनांवर लक्ष ठेवून सुरक्षिततेबाबत जागृत रहावे.
   
3. अनोळखी इसमांकडून दिल्या जाणाऱ्या खाद्य-पेय पदार्थात गुंगीकारक द्रव्य मिसळले असण्याची शक्यता असल्याने ते स्वीकारू नये / खाऊ पिऊ नये.
   
4. गर्दीच्या वेळी रेल्वेमध्ये चढताना किंवा उतरताना हँण्ड बॅग / पर्सची चेन उघडून मौल्यवान वस्तुंची चोरी होण्याची शक्यता असते म्हणुन शक्यतो ते टाळावे अथवा पुरेशी दक्षता घ्यावी.
   
5. चोरट्यांकरिता सहज प्राप्त प्रलोभन ठरेल अशा पद्धतीने दागिन्यांचे प्रदर्शन करू नये
   
6. गर्दीमुळे तसे घडल्याचे भासवून कोणतीही महिला / पुरूष प्रवासी विनाकारण अंगावर रेलत असेल / धक्काबुक्की करत असेल तर त्यापासून सावध राहवे.
   
7. महिलांनी रात्रीच्या वेळी शक्यतो पोलिस तैनात असलेल्या महिलांच्या डब्यातूनच प्रवास करावा अथवा गर्दी असणाऱ्या डब्यात बसावे.
   
8. पोलिस स्टेशनच्या ठाणे अंमलदाराने केलेल्या कारवाईने समाधान झाले नसल्यास प्रभारी अधिकारी अथवा वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना भेटावे.
   
9. नागरिकांना मदत करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे तसेच पोलिसांना सहकार्य करणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे.
   
10. आपल्या सामानाची, मौल्यवान वस्तुंची, लहान मुलांची, वृद्ध व परावलंबी व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी.
   
11. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे स्थानकांवर CCTV कॅमेरे कार्यान्वित आहेत.
   
12. आणीबाणीच्या प्रसंगी तसेच संशयित व्यक्ती, वस्तु अथवा घटनेबाबतची माहिती कळविण्यासाठी GRP अथवा RPF शी त्वरित संपर्क साधावा.
   
13.     हरविलेल्या व्यक्तींबाबत तसेच मुंबई, ठाणे, नवी मुंबई क्षेत्रातील रेल्वे अपघातांमध्ये जखमी, मयत झालेल्या व्यक्तींबाबत माहिती देणारी वेबसाईट मुंबई लोहमार्ग पोलिसांनी तयार केली असून ती www.shodh.gov.in अशी आहे. तिचा वापर नागरिकांनी अवश्य करावा.
   
 
मध्य रेल्वे सुरक्षा बल हेल्पलाइन - १२७५
 
पश्चिम रेल्वे सुरक्षा बल हेल्पलाइन - १२७६
 
रेल्वे पोलिस हेल्पलाइन - ९८३३३३११११
 
 
 
 
जाहीर आवाहन
 
काही दॄष्टप्रवृत्तीच्या लोकांकडून तसेच रेल्वेलाइन लगतच्या मोकळ्या जागेत मैदानात खेळणाऱ्या मुलांकडून गंमत-चेष्टा-मस्करी म्हणून धावत्या रेल्वेवर दगड फेकून मारण्याचे प्रकार घडतात.

फेकलेला दगड हा रेल्वेच्या वेगामुळे फेकण्याच्या वेगापेक्षा कैक पटीत जास्त वेगाने प्रवाशांना लागून प्रवाशी गंभीर जखमी, अंशतः अथवा पूर्णतः अपंग होतो अथवा प्राणास मुकतो.

अशा दुर्दैवी घटनांना आळा घालण्यासाठी अशा प्रवृत्तीचे प्रबोधन करूनच त्यांना परावृत्त करता येईल. त्यांचे मनपरिवर्तन झाले तरच त्यांच्या वर्तनात परिवर्तन शक्य आहे.

सर्व जागरूक, सूज्ञ, सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या जबाबदार नागरिकांनी यासाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे.

अशा दुर्घटनेत जखमी होणारा रेल्वे प्रवासी आपला परिचित, स्नेही, मित्र, नातेवाईक असू शकतो अथवा खुद्द आपण स्वत: असू शकतो.

असे गैरप्रकार करणाऱ्यांची माहिती असल्यास ती कृपया रेल्वे पोलिसांना कळवावी.

अशी माहिती कळविताना स्वतःचा नाव-पत्ता, स्वतःची ओळख सांगण्याची आवश्यकता नाही.
 
 
 
चोरी अथवा इतर तक्रार दाखल करण्याबाबत तसेच चोरीस गेलेला मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केल्यानंतर तो परत मिळविण्याबाबत माहिती.
 
1. प्रवास सुरु करताना किंवा प्रवासादरम्यान झालेल्या चोरीबाबत अथवा इतर गुन्ह्याबाबत ट्रेनमधील RPF कर्मचाऱ्याकडे किंवा TTE यांच्याकडे उपलब्ध असलेल्या FIR फॉर्ममध्ये प्रवासी आपली तक्रार नोंदवू शकतात किंवा गंतव्य रेल्वे स्टेशनवरील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करू शकतात.
   
2. प्रवास सुरु करताना किंवा प्रवासादरम्यान झालेल्या चोरीबाबत अथवा इतर गुन्ह्याबाबत ट्रेनमधील RPF कर्मचाऱ्याकडे किंवा TTE यांच्याकडे उपलब्ध असलेल्या FIR फॉर्ममध्ये प्रवासी आपली तक्रार नोंदवू शकतात किंवा गंतव्य रेल्वे स्टेशनवरील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करू शकतात.
   
 
 
 
महिला व बाल प्रवासी यांच्या मदतीसाठी उपाययोजना
 
1. पोलिस स्टेशन स्तरावर महिला सुरक्षितता / दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. आयुक्तालय व परिमंडळ स्तरावर महिला लैंगिक छळवाद प्रतिबंधक समित्या व महिला कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. महिला सुरक्षितता समितीच्या प्रत्येक मासिक बैठकीत कामकाजाचा आढावा घेतला जातो.
   
2. रात्री ८. ३० ते सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान प्रत्येक लोकल ट्रेनमधील महिलांच्या दोन बोगींमध्ये प्रत्येकी एक सशस्त्र पोलिस कर्मचारी नेमण्यात येतो.
   
3. महिलांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे प्रशासनाकडून बहुतेक सर्व रेल्वे स्टेशनच्या प्लाटफॉर्मवर महिलांच्या डब्यासमोर CCTV कॅमेरे लावण्यात आले आहेत.
   
4. महिला व बालकांसंदर्भात घडणारे गुन्हे गांभीर्याने व प्राधान्याने त्वरित हाताळले जातात.
   
5. अनाथ, बालमजूर, भिक्षेकरी बालकांची माहिती पोलिसांना दया.
   
6. प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये महिला व बाल कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
   
7. महिला व बालकांसाठी काम करणाऱ्या अशासकीय संस्थांच्या प्रतिनिधींना योग्य ती मदत पोलिस स्टेशनकडून दिली जाते.
   
8. धावत्या ट्रेनमधील महिला आणि बालकांच्या सुरक्षितता व सहायतेसाठी हेल्पलाइन वर संपर्क साधावा.
   
 
CHILD HELPLINE -1098
 
   
 
 
Home   About Us   Enquiry   Register Complaints   Bulletin Board   Contact
Designed and Developed by Cyber Cell Powered by SWARAJYA